शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी संजय राऊत नाशिक मध्ये दाखल

0
40

खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख आहे. पण आता या बालेकिल्ल्यातील सैनिक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे आणि त्यामुळे च ठाकरे गटात निराशेच वातावरण आहे. परंतु याच शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी संजय राऊत नाशिक मध्ये दाखल होणार आहेत. नाशिक मधील काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा सध्या सुरु होती. याच विषयावर निकाल लावण्यासाठी संजय राऊत नाशिक मध्ये येणार आहेत.

उद्या २ डिसेंबर रोजी ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांनतर मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यात शिंदे गटाचा समाचार घेण्याची शक्यता आहे. नाशिक मधील शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी संजय राऊत तिथे जाणार असल्याचे दिसते आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत असल्याने नाशिक मधील शिवसैनिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here