नाशिकमधील गावांनी केली गुजरात मध्ये विलीन होण्याची मागणी

0
36

महाराष्ट्रातील गावे कर्नाटक नेण्यावरून खूप वाद चालू आहेत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमा वाद चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अनेक नेत्यांच्या बैठका चालू आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची मतेही यावर स्पष्ट केली आहेत. तेच आता नाशिकमशील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांनी गुजरात मध्ये जाण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी ही मागणी केली आहे. सुरगाणा तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना कोणत्याही सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. गावकऱ्यांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांचाही लाभ घेता येत नाही.

सुरगाणा हा नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे. असे असूनही या तालुक्यातील रहिवाश्याना कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. या गावांचा विकास करता येत नसेल ह्या गावांना गुजरात मध्ये जाऊद्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी तहसिलदार सचिन मुळीक यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या बाबत नाशिक प्रशासन लोकप्रतिनिधीनीं अजून कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही.

गुजरात मधील सीमावर्ती भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, वीजपुरवठा इत्यादी नागरिकांना मिळणाऱ्या सुखसुविधा सुस्थितीत आहेत. तर सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या २४ वर्षात या भागात पूर्ण वीजपुरठा झालेला नाही. एवढेच काय तर इथे पाण्याची सोयही व्यवस्थित नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here