नाशिक मध्ये आजपासून रिक्षा भाड्यात वाढ सुरु करण्यात आली आहे. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने खटुआ समितीच्या शिफारसीनुसार आजपासून हा निर्णय घेतला आहे. आज पासून चालू होणाऱ्या नव्या दरानुसार प्रवाशांना पहिल्या दीड किलोमीटरसाठी २७ रूपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी नाशिकमधील सर्व रिक्षा चालकांना मीटर दुरुस्ती साठी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आजपासून रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही हे नवे भाडे स्वीकारणे बंधनकारक असेल. याचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार असून त्याच्यावर कारवाई देखील होणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय जरी प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला असेल तरी नाशिक मधील रहिवाश्यांना तो मान्य नाही. प्रवाशाला जर दहा किलोमीटर प्रवास करायचं असेल तर नव्या मीटर भाड्यानुसार त्याला १८० रुपये मोजावे लागतील. पण तेच शेअरिंग नुसार फक्त ५० रुपयेच त्याला रिक्षाचालकाला द्यावे लागतील.
श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष, बाळासाहेब पाठक यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात इंधन खूप महागले आहे. त्यानुसार अजून २० टक्के दरवाढ करण्यात यावी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम