सामाजिक बांधिलकी ; अरुण पवार यांच्याकडुन सफाई कामगाराच्या पाल्यास सायकल भेट

0
39

देवळा : देवळा सायकलिस्टचे अध्यक्ष व स्वप्निल ॲग्रो पोल्ट्री ॲण्ड हॅचरीजचे संचालक अरुण पवार व वैभव पवार यांनी नाशिक गंगापूर रस्त्याला मॉर्निंगवॉक करत असतांना रस्त्यावरील सफाई कामगार आपल्या मुलीला मोडकळीस आलेल्या सायकलीवर बसून शाळेत नेत असल्याचे चित्र पहाताच या कामगारास पवार पिता पुत्रांनी चोवीस तासाच्या आत नवी सायकल भेट दिल्याने त्यांच्या दातृत्वाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

नाशिक येथील सफाई कामगारास सायकल भेट देतांना अरुण पवार,वैभव पवार ,माजी आ जयंत जाधव आदी (छाया -सोमनाथ जगताप )

अरुण पवार व त्यांचे चिरंजीव वैभव हे गंगापूर रोडला सोमवारी सकाळी मॉर्निंगवॉक करत असताना बिग बाजारात सफाई कामगार असलेले अशोक शिंदे आपल्या मुलीला सायकलीवर बसवून ती लोटत नेत होता. ह्या सायकलीचे तुटलेलं पॅडंल ,शिटाला कापड गुंडाळलेली व अतिशय जीर्ण सायकल वरून आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात होता.

तेथे असलेले माजी आमदार जयंत जाधव व गंगापूर रोड येथील सर्वच मॉर्निंग वॉक करणाऱ्या सदस्यांनी पाहात संबंधित ग्रहास्ताला बोलवत विचारपूस केली. त्या ग्रहस्ताला सायकलची गरज असल्याची ओळखून पवार यांनी सायकलची गरज आहे ती मी देतो म्हणत गरजू पालकाला , मुलीला बोलावून माजी आमदार जयंत जाधव , पंकज नेरे,अशोक जाजू, अॅड महेश सावंत,राजेंद्र खैरनार,जगनाथ सावंत,अमोल पाटील, रामनाथ मुंदडा, रमेश पाटोळे,जगदीश भट्टड , ,सायकलिस्ट किशोर काळे ,तहसीलदार परम कासोळे,रवींद्र पुरकर, सोमनाथ धात्रक , अशोक जाजू , विलास वाघ, वैभव पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी २४ तास उलटण्यापूर्वीच त्या ग्रहस्तास सन्मानाने सायकल देण्यात आली. सायकल मिळाल्याने छोट्याशा मुलीच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसून आला.

समाजातील गरजू व्यक्तीला मदत मिळाल्याने व अगदी सहज मदत झाल्याने त्याच्या चेहऱ्या वरचा आनंद लाख मोलाचा होता.वैभव व अरुण पवार या बापलेकांच्या दातृत्वाने अनेक गरजू तसेच शाळा व सार्वजनिक ठिकाणी गरजवंताना मदतीचा हात नेहमीच पुढे असतो.
मा.आ जयंत जाधव,नाशिक.

आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वच वाढदिवस हे गरजवंतांना मदत करूनच साजरे करत असतो.त्याच बरोबर विविध उपक्रम वर्षभर सुरूच असतात. मात्र गरजवंताला दिलेल्या मदतीचे समाधान हे प्रचंड आहे.
अरुण पवार , अध्यक्ष स्वप्निल ॲग्रो पोल्ट्री ॲण्ड हॅचरीज देवळा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here