द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामधील प्रलंबित शैक्षणिक दाखले तात्काळ देण्यात यावे व दाखले देण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावी – राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांची पालकमंत्री मा. ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांचेकडे मागणी करण्यात आली
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि १० वी , १२ वी चे निकाल जाहीर झाले आहे.पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी सर्व सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियासाठी व शासनाकडून देण्यात येणारे शिष्यवृत्ती लाभ मिळण्यासाठी शैक्षणिक दाखल्याची अत्यावश्यक गरज असते.
नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये महाऑनलाईन प्रणाली व्दारे सादर करण्यात आलेल्या शैक्षणिक दाखला डिझिटल स्वाक्षरीने मंजूर केला जातो. डेस्क १, डेक्स २, डेक्स ३ च्या अधिकारी व्यक्तीकडून हे दाखले जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहे. त्याचप्रमाणे सदर दाखल्याची पावती घेऊन पालकांना तहसील कार्यालयात चकरा मारावे लागत आहे. संबंधित डेक्सचे अधिकारी जागेवर उपस्थित नसतात.
वेळेत दाखला उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे धोक्यात आले आहे व पालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
ज्या अधिकाऱ्यांकडे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून जे दाखले जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहे. याची मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश आपण द्यावे. या प्रकरणात जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर शासकीय सेवा शास्तीची अधिनियम व दफ्तर दिरंगाई कायदान्वये कारवाई करण्यात यावी. सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.
आपण स्वतः जातीने लक्ष देऊन तहसीलदार यांना शैक्षणिक दाखले देण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावे असे आदेश आपण मा.जिल्हाधिकारी साहेब यांना तात्काळ द्यावे व नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना या अत्यंत गंभीर समस्यातुन मुक्त करावे हि अपेक्षा सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावर न्याय देण्यात यावा याबाबत निवेदनाद्वारे करण्यात आले आहे अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे , उपाध्यक्ष प्रतिक रायते , गौरेश सूर्यवंशी , सरचिटणीस अनिल गोसावी , शुभम मुरकुटे , निखिल निकम , बागलाण तालुकाध्यक्ष प्रीतश भदाणे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम