पत्नीने धारदार अस्त्राने पतीचा कापला गळा वाचा काय आहे प्रकरण!!!

0
38

रोजच्या कटकटींना वैतागून पत्नीने पतीच्या गळ्यावर एका धारदार अस्त्राने वार केला आणि पतीचा मृत्यू झाला. गजानन किसन मंडळे असे मृत पतीचे नाव आहे. ही भयानक आणि धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ येथे उघडकीस आली. या प्रकरणी गजानन यांच्या भावाने त्यांचा वहिनीवर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गजानन यांच्या पत्नीवर खून केल्याचा गुन्हा दाखल केला.

गजानन मंडळे मूळचे वर्धा जिल्ह्यातील चिंचोली येथील रहिवासी होते हे सातेफळ येथे सासरी पत्नी व मुलांसह राहत होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या भावाला कळाले त्यांनी तातडीने सातेफळ गाठले ते पोचल्यावर ती त्यांना त्यांच्या भावाच्या गळ्यावर धारदार अस्त्राने वार करण्याचे निशाण दिसले ते त्या क्षणी खूप घाबरले होते परंतु त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली. या सर्व प्रकरणाची तक्रार वसंत मंडळे म्हणजे गजानन मंडळ यांचे भाऊ यांनी केली.

माझा भाऊ गजानन आणि त्याचे पत्नीचे फारसे पटत नाही त्यांचे छोट्या छोट्या कारणांवरून भांडण व्हायचे शिवाय पत्नीचे एका पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरूनही त्यांच्यात नेहमी भांडण होत होते. या वादात गजानन याच्या पत्नीने त्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला, असा आरोप त्यांनी त्यांच्या वहिनी वर केला तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आणि या कुणाचा तपासही सुरू केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here