द पॉईंट नाऊ : मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ बनावट खाते तयार करून त्यावरून शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने तक्रार केल्यावर पोलिसांनी अमेय दबडे (रा. टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल २५ वर्षीय तरुणीने नोंदवली दिली आहे. ही घटना गेल्या काही दिवसांतील आहे .
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी अमेय दबडे हे दोघं कोकणात असताना एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते पुणे येथे आले. मात्र पुण्यात आल्यानंतर पीडित तरुणीने त्या पुन्हा तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. आधी दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याने अमेय याला तरुणीच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटचे आयडी आणि पासवर्ड माहीत होते. त्याचाच गैरफायदा घेऊन आरोपी अमेय याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही न्यूड फोटो शेअर केले. तसंच त्याने तिच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून तिचा मोबाईल नंबर त्या अकाऊंटवरून शेअर केला.
आरोपीने केलेल्या या कृत्यामुळे पीडित तरुणीला अनेक अश्लील संभाषणाचे फोन येऊ लागले. तेव्हा तिने स्वत:चं अकाऊंट चेक केल्यानंतर हा सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तरुणीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सायबर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.
दरम्यान, सायबर पोलिसांनी ह्या घटनेसंबंधीचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस सध्या करत आहेत. आरोपीचे वडील हे पोलीस खात्यातून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम