चांदवड : येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेला हॉटेल राजश्री समोरील मेडियन कट राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अधिकृत खुला होता.अचानक राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाने मेडीयन कट बंद झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
२००६ पासून राष्ट्रीय मार्गावर आराखडा तयार करण्यात आला होता व त्यानुसार अधिकृतपणे मेडियन कट सुरू ठेवण्यात आला होता. चांदवड शहरात येण्यासाठी बाजूच्या नागरिकांना हाच मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो नागरिक या मेडीयन कटचा वापर करतात परंतु अचानकपणे बंद झाल्याने नागरिकांना दोन किलोमिटर अंतरावर जाऊन फेरा मारून यावा लागतो.
याच महामार्गावर कांदा खळे असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर या मेडीयन कटचा वापर करत होतो. याच ठिकाणी आजूबाजूला, कोंबडवाडी, शहा कॉलनी, भैवनाथ कॉलनी, आदर्श कॉलनी, खैसवाडा, रासेवाडी,पाचवड वस्ती. येथील वस्तीत ३ ते ४ हजार नागरिक राहत असून यांना पलीकडे जाण्यास याच मेडीयन कटचा वापर करत असतात.
मेडियन कट सुरू व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला निवेदन देण्यात आले. मेडीयन कट सुरू नाही झाला तर मोठे जनआंदोलन उभारू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम