सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे या मागणीचे पत्र नुकतेच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांना दिले आहे.
दरम्यान इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद हे एक प्रेक्षणीय पर्यटन तीर्थक्षेत्र धार्मिक स्थळ असून एक महत्वपूर्ण बाजारपेठ आहे.गावात उच्च माध्यमिक कला व विज्ञान शाखांची सोय आहे. इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षन पूर्ण झाल्यानंतर या परिसरात जवळपास कोणतेही वरिष्ठ महाविद्यालय नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
सर्वतीर्थ टाकेद हे या परिसरातील २५ पेक्षा जास्त गाव खेडी, चाळीस वाड्या वस्त्या यांचे मध्यवर्ती महत्वाचे केंद्र आहे. आज मितीस टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वी या वर्गात ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाल्यानंतर परिसरातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. विद्यार्थी संख्येची कोणतीही अडचण येणार नाही महाविद्यालयास जागा उपलब्ध करून आवश्यक ते सर्व सहकार्य ग्रामपंचायतकडून केले जाईल.
परिसरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची शैक्षणिक अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन सदर प्रस्तावाचा स्वीकार करावा आणि सर्वतीर्थ टाकेद बु ता.इगतपुरी जि.नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे असे या मागणी पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान शुक्रवार ता.०४ म वी प्र संस्थेचे नाशिक येथील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेत टाकेद येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे यासंदर्भात या परिसरातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक अडचणी होत असलेली गैरसोय यासंदर्भात चर्चा केली व वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे या मागणीचे पत्र देखील सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांना दिले याप्रसंगी जेष्ठ नागरिक आबाजी बारे हे उपस्थित होते.
“वरिष्ठ महाविद्यालय चालू करण्यासाठी जवळपास दोन एकर जागेची आवश्यकता असून टाकेद परिसरात जर महाविद्यालयासाठी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी जागा उपलब्ध करून दिली तर या परिसरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय निश्चित म वी प्र संस्थेकडून दूर केली जाईल.”
– अँड नितीन ठाकरे सरचिटणीस म वी प्र शिक्षण संस्था नाशिक
“टाकेद परिसरात दरवर्षी जवळपास शेकडो विद्यार्थी हे इयत्ता १२ वी पर्यंत टाकेद येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतात,१२ उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची उमेद, इच्छा आकांक्षा असतांना देखील केवळ आर्थिक अडचणीमुळे या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यास अडथळे निर्माण होतात.यासोबतच अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई अथवा जवळपास असलेल्या राजूर ,शेंडी, अकोले, बिटको,इंगतपुरी येथील महाविद्यालयात जातात.
अनेक विद्यार्थी गावापासून रोज ए-जा करत शिक्षण घेतात यात विद्यार्थ्यांचा येण्याजाण्यासाठी वेळ,पैसा खर्च होतो परिणामी या भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांची बस ही महाविद्यालयाच्या नियमित वेळेत पोहचत नाही यामुळे विद्यार्थ्यांचे वेळेसह शैक्षणिक,आर्थिक मोठे नुकसान होत असते.जर टाकेद याठिकाणीच वरिष्ठ महाविद्यालय चालू झाले तर या भागातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठीची गैरसोय दूर होईल व यात अनेक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.”
– राम शिंदे सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु.
“वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत शक्य होईल तितका प्रयत्न करेल.जर या भागात वरिष्ठ महाविद्यालय चालू झाले तर शेकडो विद्यार्थ्यांना याचा खुप मोठा फायदा होईल.”
– सौ ताराबाई रतन बांबळे, सरपंच ग्रामपंचायत टाकेद बु-
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम