एकनाथ शिंदे म्हणता, चांगल्या कामासाठी शरद पवारांचा आशीर्वाद, उद्धव ठाकरेंवर शरसंधान

0
34

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. निमित्त होते मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेले खास डिनर. त्यात शिंदे म्हणाले की, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी फलंदाजी करतो. आम्ही तीन महिन्यांपूर्वी फलंदाजी केली. सर्वांच्या आशीर्वादाने मी सामना जिंकला अस म्हणताच एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पवार आणि भाजप नेत्यांसोबत स्टेज शेअर केल्याने काही लोकांची झोप उडू शकते. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवणारी ही टिप्पणी असल्याचे मानले जात आहे. शिंदे म्हणाले, “पवार, फडणवीस आणि शेलार एकाच व्यासपीठावर… यामुळे काहींची झोप उडू शकते. पण राजकारण करण्याची ही जागा नाही. आम्ही सर्व खेळाचे चाहते आणि समर्थक आहोत. त्यामुळेच राजकीय मतभेद असूनही खेळाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मलाही थोडी फलंदाजी कळते. जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी फलंदाजी करतो. आम्ही तीन महिन्यांपूर्वी फलंदाजी केली. सर्वांच्या आशीर्वादाने मी सामना जिंकला. “काही मोकळेपणाने पाठींबा देतात, काही मनापासून एकत्र आहेत. मी कोणाचेही नाव घेत नाही.” शिंदे म्हणाले, ”पवार साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन असते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांचे पॅनल रिंगणात आहे. या निवडणुकीपूर्वी पवार-शेलार पॅनलतर्फे जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शरद पवार यांच्यासोबतच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक एकाच मंचावर उपस्थित होते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत जोरदार राजकारण सुरू आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात लढत आहे. अमोल काळे हे मुंबईतील व्यापारी असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संदीप पाटील यांनी अर्ज भरताना आपण पवार गटाचे उमेदवार असल्याचे सांगितले. आता शरद पवार आणि आशिष शेलार यांनी हातमिळवणी केली असून संदीप पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्याने एमसीएची निवडणूक खूपच रोमांचक बनली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here