द पॉईंट नाऊ: पाच संघांचा समावेश असलेल्या महिला आयपीएलला (डब्ल्यूआयपीएल) पुढच्या मार्चमध्ये पुरुष आयपीएलआधी सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली. वृत्तानुसार डब्ल्यूआयपीएलमध्ये एकूण २० सामने होतील. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळेल. पॉईंट्स टेबलनुसार अव्वल स्थान पटकविणारा संघ फायनल खेळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणारे संघ एलिमिनेटर खेळतील.
प्रत्येक संघ आपल्या अंतिम अकरामध्ये पाच विदेशी खेळाडू खेळवू शकणार आहे. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूंमध्ये संतुलन साधण्यासाठी आणि स्पर्धा वाढविण्यासाठी सध्या पाच संघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक संघात एकूण अठरा खेळाडूंचा समावेश असून कोणत्याही संघाला सहापेक्षा जास्त विदेशी खेळाडू घेता येणार नाहीत. अंतिम अकरामधील पाचपैकी चार खेळाडू पूर्णकालीन सदस्य देशांचे तर एक खेळाडू सहयोगी सदस्य देशांतील असेल. ऑस्ट्रेलियात खेळली जाणारी बिग बॅश तसेच इंग्लंडमध्ये द हंड्रेड महिला या दोन्ही लीगमध्ये तीनपेक्षा जास्त विदेशी खेळाडू खेळविता येत नाही.
डब्ल्यूआयपीएलच्या संघांची संख्या कमी असल्याने भारतात ‘होम ॲन्ड अवे’ पद्धतीने सामने खेळविणे अशक्य असल्याने. डब्ल्यूआयपीएलचे आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत ९ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकानंतर लगेचच केले जाईल.
डब्ल्यूआयपीएल म्हणजेच महिला आयपीएल स्पर्धेत ‘होम ॲन्ड अवे’ पद्धतीने सामने खेळविणे आव्हानात्मक असेल. त्यादृष्टीने सामने एका स्थळी तर नंतरचे दहा सामने दुसऱ्या स्थळी आयोजित करण्याची सूचना आली. सहभागी संघांची विक्री क्षेत्रीय पद्धतीने होईल. प्रत्येक्ष क्षेत्रामधून दोन शहरांची निवड करण्यात येत आहे. यामध्ये पुणे / राजकोट (पश्चिम), धर्मशाळा/ जम्मू (उत्तर क्षेत्र),रांची/कटक (पूर्व),इंदूर / नागपूर/रायपूर (मध्य), कोच्ची / विशाखापट्टनम (दक्षिण) आणि गुवाहाटी (ईशान्य) या शहरांचा समावेश आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]