ओझर महामार्गावरील बाणगंगा पुलावर पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

0
46

द पॉईंट नाऊ: ओझर येथील मुंबई-आग्रा महामागांवर बाणगंगा नदीच्या पुलावर असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनला वेगाने येणाऱ्या कंटेनरचा एक्सेल रोड अडकून पाइपलाइन कापली गेल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

गुरुवारी सकाळी मुंबईकडे जाणान्या कंटेनरमध्ये विपाड झाल्याने कंटेनरचा तुटलेला एक्सल अँड ओझर येथील बाणगंगा नदीवरील पुलावर असलेल्या पाणीपुरवठा करणान्या पाइपलाइनला अडकल्याने पाइपलाइन कापली गेल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू .

नगर परिषद कर्मचान्यांना ही बाब समजताच त्यांनी त्वरित दखल घेत जलकुंभ भरण्यासाठी जाणान्या ४०० एमएम व्यासाच्या मुख्य पाइपलाइनचा पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर होणाऱ्या ओशर व परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला असून, पाइप जोडण्याचे काम युद्धपातळीवर कर्मचान्यांच्यावतीने सुरू आहे. गुरुवारी होणारा पाणीपुरवठा हा शुक्रवारी व शुक्रवारी होणारा पाणीपुरवठा शनिवारी करण्यात येईल, असे नगर परिषद पाणीपुरवठा विभाग कर्मचान्यांनी सांगितले. मुंबई-आग्रा महामार्गावर उपद्व्यावर असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या
पाइपलाइनला महाराष्ट्र जलप्राधिकरण व मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच लावलेले नसल्याने झालेल्या नुकसानीबद्दल ओझरकरांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here