नाशिक बस अपघात : आणखी दोघांचे मृतदेह आढळले; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

0
40

Nashik Bus Fire : नाशिकमध्ये पहाटे झालेल्या बस अपघातात आणखीन ३ जणांचे मृतदेह आढळले असून मृत्यूंची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.

आज पहाटे शहरातील नाशिक-औरंगाबाद मार्गांवरील मिरची हॉटेल सिग्नलजवळ ट्रेलर व खाजगी बसच्या धडक झाली असून यात खाजगी बसला मोठी आग लागली होती. यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र ही आग आटोक्यात आल्यानंतर केलेल्या पंचनाम्यात आणखीन तीन मृतदेह आढळले असून यात एका बालकासह दोन मृतदेहांचा समावेश आहे. हे मृतदेह गाडीच्या सीटखाली आढळले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात ह्यांची ओळख पटली जाणार असून ह्या दोन मृतदेहांमुळे अपघातातील मृतांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.

मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, राहुल ढिकले व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आदी उपस्थित आहे. नुकतीच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून ते जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांच्या भेट घेत तिथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाकडून अपघातग्रस्त जखमींची यादी जाहीर

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने अपघातातील जखमी असलेल्या रुग्णांची यादी जाहीर केली असून आतापर्यंत ३१ जण जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील एका जखमीवर आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here