इडली विक्रेत्यांकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त….

0
46

द पॉईंट नाऊ: नाशिकमध्ये रोजगारासाठी आलेल्या एका इडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाखांच्या बनावट नोटा सापडल्याची घटना उपडकीस आली आहे. भारतनगर येथे इडली विक्री करणान्या मलायारसन मदतसमय यांच्याकडून ५०० आणि दोन हजार रुपयांच्या २४४ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मलायरासान मदसमय (३३) हा मूळ तामिळनाडू राज्यातील आहे. नाशिकमध्ये तो गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वास्तवास आहे. या भागात इडली विक्रीये काम तो करतो. त्याच्याकडे बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात अजून कोण कोण सहभागी आहेत, याचा पोलीस शोध घेत असून, त्याच्याकडून एकूण ५ लाख ८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा २ हजार तीनशे रुपये रोख रकम आणि मोबाइल जप्त करण्यात आता आहे.

भारतीय चलनाच्या ५०० रुपये किमतीच्या ४० बनावट नोटा व २००० रुपये किमतीच्या २४४ बनावट नोटा विक्री करण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडे असलेल्या नोटांचे निरीक्षण केले असता, त्यावर महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क नाही. सेक्युरिटी थ्रेड नसून, त्या जागी हिरव्या रंगाचे रेडियमचे तुकडे चिटकल्याचे दिसत होते. ५०० रुपयांचे एकूण ५ प्रकारचे वेगवेगळे नंबर असून, २००० रुपयांचे एकूण २७ प्रकारचे वेगवेगळे नंबर आहेत. चांगल्या कागदाचा वापर करून त्यावर कलर प्रिंट मारलेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, सहा. पोलीस आयुक्त दीपाली खत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे, उपनिरीक्षक किरण रोंदळे आदींच्या पथकाने केली.

प्राथमिक चौकशीत त्याने २ ते ३ नोटा कालिकामाता यात्रोत्सवादरम्यान गर्दीत वापरल्या असून, त्याने त्या त्याच्या गावाकडे ३००० रुपयांत १ लाखाच्या बनावट नोटा खरेदी केल्याचे सांगत आहे. संशयित पूर्वी नाशिक येथे राहण्यास होता. तसेच इडली विक्रीचा व्यवसाय करायचा त्याची पत्नी मुलांसह त्यास सोडून गेलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here