नाशिक : राज्यासह देशभरात आधीपासून पेट्रोल व डिझेलने शंभरी गाठलेली असतानाच आता सीएनजी गॅसच्या दरातही दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. त्यामुळे आता सीएनजी गॅस शंभरच्या पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहे.
आज मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात सीएनजी गॅसचा दर प्रतिकिलो ९६.५० इतका झाला आहे. यांमुळे सीएनजी गाड्या चालवणाऱ्या शहरातील नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
नाशिकमध्ये साधारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीएनजीचे दर प्रतिकिलो ७१ रुपये इतके होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस त्यात वाढ होऊन १० रुपयांनी तर जून महिन्यात ४ रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात चार रुपयांची वाढ झाली असून सीएनजीचा भाव ९६.५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान, मोठ्या शहरांबरोबरच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने रस्त्यांवर दिसत असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पण नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक भागात सीएनजी गॅस स्टेशन नाही. त्यामुळे शहरात काही महत्वाच्या ठिकाणी सीएनजी गॅसची असणारी कमतरता आणि आयात गॅस महाग होणे हीसुद्धा ह्या गॅसच्या दरवाढीची कारणे आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम