महापालिका प्रशासनाच्या महासभेत डॉक्टर भरतीला मंजुरी

0
11

द पॉईंट नाऊ: मनपा रुग्णालयांत डॉक्टर व इतर वैद्यकीय स्टाफ उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जिवाशी हेळसांड सुरू आहे. महापालिकेत १८९ इतक्या डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, पालिकेत अवघ्या ६५ डॉक्टरांवर आरोग्यसेवेचा भार आहे. तब्बल १२४ पदे रिक्त असल्याने मानधनावर डॉक्टर भरती व्हावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर प्रशासनाने निर्णय घेत काल ४४ डॉक्टरांच्या भरतीला मंजुरी दिली.

गुरुवारी महासभा बोलावत मानधनावर डॉक्टर भरतीला मंजुरी दिल्याने एकप्रकारे आरोग्य भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण ४४ जागांची भरती आरक्षण कोट्यानुसार केली जाणार असून, त्यासाठी हा प्रस्ताव प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. पुढील एक महिन्यात ही प्रक्रिया मार्गी लागून डॉक्टर भरतीची जाहिरात काढली जाईल.वैद्यकीय आरोग्य विभागाने ४४ डॉक्टर भरतीचा प्रस्ताव तयार केला व तो मंजुरीसाठी महासभेकडे पाठवला. त्यात दहा एमबीबीएस व ३५ स्पेशलिस्ट डॉक्टरांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे आज महापालिकेला भेट देणार असून, विविध विकास प्रकल्प व रेंगाळलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहे. मनपा रुग्णालयांत डॉक्टर व इतर वैद्यकीय स्टाफ उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जिवाशी हेळसांड सुरू आहे. महापालिकेत १८९ इतक्या डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी आजमितीस केवळ ६५ डॉक्टरांवरच मनपा आरोग्यसेवेचा भार आहे. तब्बल १२४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मानधनावर डॉक्टर भरती करावी, ही मागणी केली जात होती. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी राबवलेली भरतीप्रक्रिया विद्यमान आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रद केली. बिंदूनामावलीनुसार ही भरती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, नाशिक पालिकेच्या रुग्णालयामध्ये पुरेसे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर नसल्याने याचा मोठा फटका शहरातील रुग्णांना बसत आहे. हजारो नागरिकांसाठी अवघा एक डॉक्टर आरोग्य उपकेंद्रात असल्याचे चित्र आहे.अनेकदा याप्रश्नी लक्ष वेधत आरोग्य भरती करण्याची मागणी केली जात होती. अपुन्या मनुष्यबळाचा ताण डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्यांवरदेखील येत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here