द पॉईंट नाऊ: डेंग्यू, स्वाइन फ्लू या आजारांनी नाशिककर त्रस्त असताना आता हात, पाय, तोंडाला (हँड-फूट माऊथ) होणाऱ्या विषाणूजन्य आजाराने लहान मुलांना बेजार केले आहे. पावसाळ्यात उद्भवणारा हा आजार एक वर्षाच्या बाळापासून पंधरा वर्षांच्या मुलांमध्येही आढळून येत आहे. सुरुवातीला ताप, नंतर हात-पाय-तोंडात पुरळ उठणे ही लक्षणे असून, ही या आजाराची मुख्य लक्षणे पुरळ चार ते सहा दिवस राहत असल्याने मुले हैराण झाली आहेत. नाशिकमध्येही या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुलांची काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे.
वातावरणातील सतत होणाऱ्या बदललामुळे सर्दी, खोकला, तापाने लहान मुले त्रस्त असताना आता हैंड-फूट-माऊथ या विषाणूजन्य आजाराने मुलांना पुरते हैराण करून सोडले आहे. साधारणतः पावसाळ्यातच विशेष करून सप्टेंबरमध्येच हा आजार होतो. या आजाराचे शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. संसर्ग झालेल्या मुलाच्या हातावर, पायावर, तसेच कमरेवर कांजण्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पुरळ उठत आहे पुरळ उठल्यानंतर मुले लगेच तापाणी फणफणताना दिसून येत आहे. तसेच मुलांच्या तोंडातही अल्सर येत आहे. छोट्या छोट्या फोडांमुळे मुलांना अन्न गिळणेही अवघड होत आहे. काही मुलांच्या सर्वांगावर पुरळ उठत आहे बऱ्याचदा मुलांना कांजण्या झाल्याचा समाज पालकांकडून होत आहे. या पुरळ मुळे अंगावर खाज सुटत असल्याने मुले हैरान झाली आहेत, असे बाळरोगतज्ञांनी सांगितले.
हॅन्ड फूट माऊथ हा संसर्गजन्य आजार असल्याने मुले एकमेकांच्या सानिध्यात येताच आजारी पडत असल्याचे निदर्शनास आले. प्रतिकार शक्ती कमकुवत असणारी मुले या आजाराला लवकर बळी पडत आहेत तसेच शाळांमध्येही एका मुलाकडून दुसऱ्या मुलांमध्ये या आजाराचा प्रसार होत आहे.
या संसर्गजन्य आजारापासून स्वतःचे व लहान मुलांचे संरक्षण करण्यास डॉक्टरांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकताना तोंडावर हात ठेवणे, साबण नसल्यास सॅनिटायझर वापरणे, अन्य वस्तूंना हात न लावणे किमान २० सेकंद हात धुणे,अन्न तयार करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी शिंकल्यानंतर किंवा खोकल्या नंतर आपले हात धुणे साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तेव्हा हँड सॅनिटायझर वापर ण्याचा सल्ला दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम