शहरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिर उद्घाटनासाठी सज्ज….

0
41

द पॉईंट नाऊ: नासिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर ऐतिहासिक वारसा लाभलेले भव्य दगडी कोरीव शिखर-बुद्ध ‘बीएपीएस स्वामीनारायण मंदिर’ लवकरच पूर्ण होणार आहे. नाशिकच्या पंचवटीतील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू होते, जे आता जवळपास तयार झाले आहे. साधूभक्ती प्रियदास स्वामी यांच्या हस्ते प्रसाद प्रवेश विधी पार पडला. या दिव्य कार्यक्रमात प्रकाश ब्रह्मस्वरूप महंतस्वामी महाराज, विवेकसागर दास, घनश्याम चरण दास, महाव्रत दास, श्रुतिप्रकाश दास आदी मान्यवर उपस्थित होते.

कोविड महामारीचा काळ सोडला तर संपूर्ण चार वर्षे मंदिराचे बांधकाम अविरतपणे सुरू राहिले. आणि आता शेवटी हे काम लवकरच संपूर्ण होऊन भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात विविध पूजांचे आयोजन करण्यात आले असून त्यांमध्ये, प्राणप्रतिष्ठा विधीचा एक भाग म्हणून सोमवारी जागतिक शांतता महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार, २८ सप्टेंबर रोजी मुख्य वेदोक्त मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. शुक्रवार २३ सप्टेंबरपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण झाल्यानंतर अनुष्ठान सुरु केले.

BAPS स्वामीनारायण मंदिरा बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी
गोदावरी नदीच्या काठावर हे भव्य दगडी कोरीव शिखरबद्ध मंदिर आहे.
उपासकांना मंदिराची प्रदक्षिणा घालण्यासाठी मध्यवर्ती मंदिराभोवती पायवाट आहेत.
हे सुरेख नक्षीकाम आणि जडलेल्या संगमरवरींनी सजवलेले आहे.
देशभरातून सुमारे १०,००० भाविक दररोज या विधीसाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सुमारे १,००० स्वयंसेवक एकत्र काम करत आहेत, ज्यामध्ये ३५० हून अधिक संत सहभागी होत आहेत.
उपस्थितांसाठी स्वामिनारायण ट्रस्टतर्फे भोजन व निवासासह वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here