घोटी पोलिसांची धडक कारवाई : घोडेवाडीत केला ५० कीलो गांजा जप्त

0
37

राम शिंदे
इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद हद्दीतील घोडेवाडी शिवारात सोमवार ता.२६ दुपारच्या सुमारास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगने तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी कविता फडतळे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब राऊत, पोलीस हवालदार सुहास गोसावी, पोलीस शिपाई केशव बसते यांनी घोडेवाडी शिवारात दुपारच्या सुमारास छापा टाकत शेतकरी चिमाजी घोडे वय (५०) यांच्या शेतावरील बांधावर लागवड केलेल्या जवळपास ७० ते ८० (पाच ते सहा फूट) उंचीची गांजाची झाडे जप्त केली या झाडांचे घटनास्थळी वजन केले असता अंदाजे पन्नास की.लो ग्रॅम वजनाचा गांजा घोटी पोलिसांनी जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील घोडेवाडी शेत शिवारात गांजा असल्याची माहिती घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह पोलिसांना मिळताच घोटी पोलिसांनी या माहितीची खात्री करत सोमवार ता.२६ रोजी घोडेवाडी शिवारातील शेतकरी चिमा घोडे यांच्या शेतावर छापा टाकत धडक कारवाई करत पन्नास किलो गांजा जप्त केला.

यावेळी इगतपुरीचे नायब तहसीलदार पी.डी.गोंडावळे, घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब राऊत,पोलीस हवालदार शीतल गायकवाड, पोलीस हवालदार केशव बसते, सुहास गोसावी, गोपनीय विभागाचे निलेश साळवे, पंकज दराडे, पोलीस हवालदार विक्रम झालटे, धर्मराज पारधी, पोलीस नाईक जगताप, मथुरे आदी पोलीस बांधवांसह होमगार्ड टीम व पंच म्हणून तलाठी सचिन कराते, मारुती लोहकरे, पी आंबेकर यांच्यासहपोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, सुभाष कोरडे,लालमन घोडे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

सदर शेतकरी चिमाजी घोडे वय (५०) यांस घोटी पोलिसांनी अटक करून पंचनाम्यासह गुन्ह्याची नोंद केली आहे.सदर शेतकरी चिमाची घोडे यांनी गांजाची लागवड का केली, सदर गांजा कुठे विक्री केल्या जाणार होता आदी माहितीसह पुढील तपास पोलीस करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here