डॉक्टरांच्या चुकीमुळे बाळंत महिलेचा मृत्यू ; नातेवाईकांचा सकाळपासून पोलिस स्टेशनला ठिय्या

0
29

विकी गवळी | चांदवड

तालुक्यातील मंगरूळ येथील प्रियंका विकी निरभवणे वय २४. गर्भवती असल्याने काही दिवसांपूर्वी चांदवड येथील हॉस्पिटल येथे तपासणीसाठी गेली असता डॉक्टर यांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले व द्वारकाधीश हॉस्पिटल यांच्याकडे सोनो ग्राफी केली.

सोनोग्राफी रिपोर्ट नुसार डॉ. यांनी सिजर करून प्रसूतीचा सल्ला दिला व महिलेला फक्त गर्भधारण होऊन महिलेला ८ महिने २० दिवस झाले होते. डॉक्टरांनी प्रसूती केली व काही दिवस पी के मेमोरियल पवार हॉस्पिटल येथे ऍडमिट ठेवले परंतु काही दिवसानी महिलेला उलट्या व जुलाब होण्यास सुरुवात झाली त्यावेळी डॉक्टर यांनी पेशन्टला पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटल येथे पाठवले असता काही दिवस तेथे उपचार घेतले. तब्येतीत कोणतेही सुधारणा होत नसल्याने तेथील डॉक्टर यांनी पेशन्टला घेऊन जाण्यास सांगितले व सदर महिलेला मुबंई येथील के इ एम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.

उपचार सुरु असतांना प्रियंका हिचा मृत्यू झाला. यांना जबाबदार धरून चुकीचा उपचार केल्याने संपूर्ण शरीरात विष पसरल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला आहे असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

सदर महिलेचा मृतदेह चांदवड पोलीस स्टेशनला आणला असून नातेवाईकांनी जो पर्यंत संबंधधित डॉक्टरानंवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यत मृतदेह पोलीस स्टेशन आवारातच ठेऊ असे म्हणणे आहे. सदर हजारो नागरिकांनी गर्दी केली असता चांदवड उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांनी नातेवाईकांनां समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता परंतु सर्व नातेवाईक आक्रमक झाल्याने कोणीही ऐकण्यास तयार न्हवते जो पर्यत गुन्हा नोंद होवून न्याय मिळत नाही तोपर्यत आम्ही मृतदेह घेऊन जाणार नाही असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले होते रात्री उशिरा पर्यंत मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नव्हता. पोलीस स्टेशन काही दिवसभर तणावाचे वातावरण होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here