नाशिक : नाशिक ग्रामदेवता असलेल्या कालिकामाताच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठीची मंदिर संस्थान व मनपा प्रशासनाकडून सुरु असलेली तयारी आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे.
ग्रामदैवत कालिका मातेचा नवरात्रोत्सव गेल्या दोन वर्ष कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्यामुळे नव्हता झाला. पण यंदा निर्बंधमुक्त वातावरणात कालिकामातेची यात्रा पार पडणार आहे. म्हणून त्यासाठी मंदिर संस्थांकडून जय्यत तयारी सुरु आहे. मंदिर परिसरात मंडप उभारणी व आकर्षक लायटिंग लावले जात आहे. तसेच यंदा २४ तास मंदिर खुले असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य नियोजन केले जात आहे. त्यासाठी स्त्री-पुरुषांची वेगळी रांग असणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर संस्थानाकडून सुरक्षारक्षकाची नेमणूक केली असून ते या संपूर्ण सुरक्षा यंत्रणाची पाहणी करत आहे. यासोबतच भाविकांना प्रसादासाठी वेगळी सोयदेखील संस्थानातर्फे केली जात आहे.
यात्रा म्हटली की, रहाटपाळणा हा येतोच. आणि नाशिकरांना गत दोन वर्षे ह्या यात्रेचा आनंद घेता नव्हता आला, तो यंदा घेता येणार असल्याने विविध ठिकाणांहून रहाटपाळणे शहरात दाखल झाली आहेत. केवळ एवढेच नाही, तर रस्त्याच्या दुतर्फा विविध खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॅालही विक्रेत्यांकडून उभारली जात आहे.
तसेच, महापालिकेकडून गडकरी चौक ते मुंबई नाकापर्यंत पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी केली जात असून यात्रा मार्गांवर डांबरीकरण केले जात आहे. यासोबतच वीजजोडणी, सीसीटीव्ही यंत्रणा व आदी सुरक्षा यंत्रणेची पाहणी पोलीस व मनपा प्रशासनाकडून केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम