बुरखा घालून प्रेयसीला भेटायला आला, मुलं पळवणारा समजून रहिवाश्यांनी धो-धो धुतला

0
46

नाशिक : शहरातील वडाळा येथे एक युवक आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला खरा. पण काहींनी मुलं पळवणारा समजून त्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

येथे एक तरुण आपल्याच परिसरातील तरुणीवर प्रेम करत होता. तो दुपारी आपल्या प्रेयसीच्या घरासमोर बुरखा घालून उभा होता. यावेळी तरुणीच्या घराजवळ गर्दी झाल्याने हा तरुण एका पानटपरीवर उभा राहिला. पण पानटपरीचालक त्याला महिला समजून त्याची विचारपूस करत होता, यावर काहीच उत्तर दिले नाही. मात्र, अचानक त्या पानटपरीचालकाचे लक्ष त्याच्या बुटाकडे गेले व सदर बाब चालकाने आपल्या ओळखीच्या नागरिकास सांगितले. अखेर तिथल्या काहींनी बुरखा घातलेल्या तरूणास नाव विचारले असता त्याने बोलण्यास नकार दिला. त्यावरून नागरिकांनी त्याला मुलं पळवणारा टोळीतला सदस्य असणारा समजून त्यांनी तरुणाची धुलाई केली.

दरम्यान, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे हे शासकीय वाहनातून जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला व त्यांनी जमावाला शांत करत त्या तरुणाची सुटका केली. यावेळी शिंदे यांनी इंदिरानगर पोलिसांना हा प्रकार कळवला आहे.

विशेष म्हणजे हा तरुण त्याच परिसरात राहत असून त्याचे बिंग फुटू नये, म्हणून तो बुरखा घालून त्या तरुणीला भेटण्यासाठी तो तिथे येत होता. मात्र, मारहाणीनंतर त्याने हा प्रकार पोलिसांना सांगितला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here