3 लाखांची लाच घेतांना PSI ला अटक ; सट्टा सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक जिल्ह्यात सध्या लाच खोरीचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच कार्यकारी अभियंता यांच्या जलसंपदा विभागातील दोन लिपिक लाच स्वीकारताना जाळ्यात सापडल्याची घटना नुकतीच घडली असताना. आज नाशिकमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक व एका व्यक्तीस तीन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

नाशिक मधील महेश वामनराव शिंदे नामक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. आयपीएलच्या सट्टयाप्रकरणी कारवाई न करणे आणि सट्टा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी पीएसआय असलेल्या शिंदे याने संजय आझाद खराडे नामक एका खासगी व्यक्तीच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात शनिवारी रोजी चार लाखांची लाच मागितली होती.

रक्कम मोठी असल्याने तडजोड करून आज तीन लाख रुपये लाच देण्याचे ठरले होते. दरम्यान, याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

दरम्यान, आज नाशिकच्या एसीबीने (ACB) सापळा रचला आणि खासगी व्यक्ती असलेल्या संजय खराडे यास लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यावेळी चौकशीकेली असता ही लाच पीएसआय शिंदे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे समोर आले आहे.

यावेळी सापळा पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्रचे सुनील कडासने व प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिकचे सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, सह अधिकारी पोलीस अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्यासह पो.हवा. प्रफुल्ल माळी, पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रभाकर गवळी, पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना. शिरीष अमृतकर व चालक पो.हवा. संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक- ला.प्र.वि., नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here