मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतील गोरेगावात शिवसेना गटप्रमुखांचा मेळाव्यात उपस्थित राहणार आहे. या सभेत ते काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दसरा मेळावा कुणाचा ? यावरून दोन्ही गटातील हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इकडे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच व्हावा, यासाठी स्वतः ठाकरे पुढाकार घेत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे ठाकरेंना आव्हान करत शिवाजी पार्कवर आमचाच मेळावा होणार, असा दावा करत आहे. पण अद्यापही कोणत्याच गटाला परवानगी मिळाली नाही, त्यामुळे हा पेच कायम आहे.
तसेच दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे गट मुंबई हायकोर्टात गेला असून, शिंदे गटाचे मंत्री संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. त्यामुळे दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंच्या ह्या मेळाव्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात आज शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. यात उद्धव ठाकरे काय बोलतील ? पक्षाची आगामी भूमिका काय असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेला आहे.
मुंबईतील सुमारे ३० ते ३५ हजार पुरुष व महिला पदाधिकारी या मेळाव्यासाठी यावेळी सहभागी होणार आहे. तसेच असंख्य शिवसैनिक “चलो गोरेगाव”चा नारा देत यात सहभागी होणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम