पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी करण्याची भाजप नेत्याची मागणी

0
27

मुंबई – पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात एका माजी मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. हाच धागा पकडून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या घोटाळ्यात शरद पवारांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

पत्राचाळीतील १,०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सुरूवातीपासून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने याआधीच केला आहे. याप्रकरणात ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात ईडीने असे म्हटले आहे, की २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी झाले होते, असा उल्लेख आरोपपत्रात केला आहे. नेमका हाच धागा पकडून आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पत्राचाळ प्रकरणीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता राऊतांना ते झेपवणारे नाही. ह्यात बड्या राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात शरद पवार यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, पवारांनी याप्रकरणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तत्कालीन गृहनिर्माण सचिव व म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चादेखील केली होती, असा आरोप त्यांच्यावर केला आहे.

यावेळी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे, की पत्राचाळ पुनर्विकासात संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच थेट सहभाग होता. २००६-०७ मध्ये या चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यात संजय राऊत, म्हाडा अधिकारी, राकेश बाधवान आदि सहभागी झाले होते. तसेच याप्रकरणावर नियंत्रण राहण्यासाठी संजय राऊत यांनी प्रवीण राऊतांना मोहरा म्हणून मे. गुरू आशिश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमीटेडचा संचालक केले आहे.

सध्या ह्या प्रकरणात संजय राऊत तुरुंगात असून ईडीमार्फत त्यांची चौकशी अजूनही सुरु आहे. त्यातच आता या आरोपांमुळे राउतांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दैस्त आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here