देवळा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर डंका

0
8

देवळा ; क्रीडा भारती या संघटनेने अखिल भारतीय स्तरावर घेतलेल्या क्रीडा ज्ञान स्पर्धा परीक्षेत येथील पब्लिक स्कूलच्या १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता . पैकी इ. १० वीचा खेळाडू करण धुळेने याने ५० पैकी ४४ गुण (वेळ -१५ मिनिटे ) मिळवत अखिल भारतीय स्तरावर गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले.

अखिल भारतीय स्तरावर गुणवत्ता यादीत आलेला विद्यार्थी करण धुळे याचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव प्राचार्य के डी पाटील क्रीडा शिक्षक सुनील देवरे आदी छाया सोमनाथ जगताप

या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यशस्वी खेळाडूचे गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश गिते , प्राचार्य के. डी. पाटील, क्रीडा भारतीचे सर्व पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थीला क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here