कृषी प्रतिनीधी : कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून राज्यकर्त्यांनी शहरी धोरण जोपासल्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे. कांद्याच्या घसरत्या भावामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलले आहे. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिले. महाराष्ट्राच्या सीएमओ कार्यालयानुसार, महाराष्ट्र सरकारने पीयूष गोयल यांना राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) मार्फत राज्यभरात सुमारे 2 लाख टन कांदा खरेदी करण्याची विनंती केली.
महाराष्ट्रातील कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना नाफेडच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधीतून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची विनंती केली. मात्र, सीएमओने जारी केलेल्या निवेदनात राज्यातील कांद्याच्या सध्याच्या विक्री दराबाबत काहीही सांगण्यात आले नाही.
बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल
गेल्यावर्षी कांदा बियाण्यांचे दर गगनाला भिडलेले असताना शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली मात्र यावरील खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा हे महाराष्ट्रातील मुख्य पीक आहे आणि देशाच्या एकूण भाजीपाला उत्पादनात त्याचा वाटा जवळपास 35 ते 40 टक्के आहे. मान्सूनच्या सुरवातीपासून, 2021-22 मध्ये कांद्याचे उत्पादन 136.70 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जे मागील हंगामाच्या तुलनेत 20 लाख मेट्रिक टन अधिक आहे.
बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. त्याच वेळी, श्रीलंकेतील ढासळलेली आर्थिक परिस्थिती हे देखील कांद्याचे भाव घसरण्याचे एक कारण होते. मागील विक्रम मोडीत काढताना केंद्र सरकारने 2022-23 हंगामासाठी 2.50 लाख टन कांद्याची खरेदी केली. रब्बी पिकामध्ये एप्रिल-जून या कालावधीतील कांद्याचे कापणी भारताच्या कांद्याच्या उत्पादनापैकी 65 टक्के आहे आणि जे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाच्या काढणीपर्यंत ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करत आहे.
नाफेड शेतकऱ्यांच्या मुळावर?
शेतकरी संतप्त झाले असून त्यांच्या मते सरकारने नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केलाय तो आता कमी दरात ग्राहकांना विकला जात असल्याने हे सर्व घडून आल्याची भावना निर्माण झाली आहे. खर म्हणजे सप्टेंबर अखेर कांदा दरात वाढ शेतकऱ्यांना अपेक्षित असताना केंद्रानं दुटप्पी भूमिका घेत पूर्वी खरेदी करून शेतकऱ्यांची वाह वाह मिळवलेला कांदा आता केंद्राने ग्राहकांना पुरवठा केला आहे. यामुळे कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांना अंदाज आलेला नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम