शहरातील प्रस्तावित हॉकर्स झोन्स रद्द; आयुक्तांचे नव्याने सर्वेक्षणाचे आदेश

0
45

नाशिक – शहरातील प्रस्तावित ठिकाणी जिथे हाॅकर्स झाेन निश्चित केले आहे, ते रद्द करून आता नागरिकांच्या मागणीनुसारच नवे हाॅकर्स झाेन उभारले जातील, असे मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करण्यासाठी शहरात १२५ हाॅकर्स झाेन निश्चित केले होते. मात्र ज्या हाॅकर्स झाेनमध्ये फेरीवाले स्थलांतरित हाेत नसतील, अश्या जागेची पडताळणी करून तेथील हाॅकर्स झाेन्स रद्द करावे. तसेच, वारंवार सूचना देऊनही नाेंदणी प्रमाणपत्र न स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांची मान्यता रद्द करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

शहरात महत्वाच्या चौकांत फेरीवाले व विक्रेते अनधिकृतपणे बसत असल्यामुळे रहदारीस अडचण हाेत असते. त्यामुळे केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेने हे झाेन निश्चित केले होते. तसेच, जवळपास १०,६१४ फेरीवाल्यांची ह्या हाॅकर्स झाेनमध्ये नाेंदणीही झाली होती. मात्र, नानाविध कारणांमुळे अनेक हाॅकर्स झाेनमध्ये हे फेरीवाले स्थलांतरित झाले नाही. त्यानंतर काेराेना व अन्य कारणांमुळे काही फेरीवाले तिथून गायब झाले, तर काही हाॅकर्स झाेन गैरसाेयीचे असल्यामुळे त्याकडे पाठ फिरवली.

यासंदर्भात, आज फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली. बैठकीनंतर आयुक्तांनी फेरीवाला धाेरणाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरात मिळकत विभागामार्फत नव्याने सर्वेक्षण करून नवीन हाॅकर्स झाेन्ससाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here