शहरात पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु

0
16

नाशिक – तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या जल्लोषानंतर आज सगळीकडे गणरायाला निरोप दिला जात आहे. नाशिक शहरातही गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असून शहरात आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

यावेळी मंत्री गिरीश महाजन व आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे व अॅड. राहुल ढिकले व मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथे मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंत्री महाजनांनी ढोल वाजवत मिरवणुकीत सहभागी झाले.

सर्वात प्रथम महापालिका कर्मचारी मंडळाचा गणराया मार्गाक्रमित झाला. त्यानंतर मानाचा चांदीचा गणपती, गुलालवाडी व्यायामशाळेचा गणपती, नाशिकचा राजा, साक्षी गणेश गणपती व इतर मंडळांचे गणपती एक-एक करून विसर्जनासाठी मार्गक्रमण झाले. यंदा २५ गणेशोत्सव मंडळे  विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहे. यावेळी मानाच्या गणपतींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी अनेक ठिकाणी विविध ढोल-ताशा पथके आपल्या सहस्रानंद वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देत होते. मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले, गुलालवाडी व्यायामशाळेचे लेझीम पथक. पथकात अनेक लहान मुले, महिलांनी सामील होत शिस्तबद्ध तालाने ढोल-ताशे वाजवत उत्साहात रंगत आणली. मिरवणूक वाकडी बारव येथून सुरु होऊन ती दुधबाजार-गाडगे महाराज पुतळा-जुनी महापलिका बिल्डींग मार्गे अशोकस्तंभ-मालेगाव स्टँडहून गोदावरी नदीत गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. यंदा पावसाचे सावट असल्याने मंडळांना विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here