शहरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

0
54

नाशिक प्रतिनिधी – गेल्या दोन दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने आज ऐन संध्याकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार हजेरी लावली आहे. यामुळे आज गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणपती देखावा बघण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

मागील काही दिवसांपासून शहरवासियांना सकाळी कडक उन्हाचे व संध्याकाळी पावसाचे दर्शन बघण्यास मिळाले होते. त्यात सलग दोन दिवस मात्र पावसाने ब्रेक घेतला, त्यामुळे संध्याकाळी देखावा बघण्यासाठी अनेक गणेशभक्त मोठी गर्दी करत होते.

आजही सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. आणि साडेपाचच्या सुमारास शहरात पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अशोकस्तंभ, पंचवटी, आडगाव आदि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे देखावा बघण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी फेरले.

दरम्यान, हवामान विभागाकडून जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच मुंबई, पुण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here