नाशिक महापालिकेकडून विविध भागांतून ३४१ गणेशमूर्ती संकलित

0
35

नाशिक प्रतिनिधी – शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे, प्रत्येकाच्या घरी बाप्पा आलेला आहे. पण काहींच्या घरी दीड ते पाच दिवसांचा गणपती असतो. त्यांचे विसर्जन पार पडले.

याच पार्श्वभूमीवर दरवर्षी नाशिक महानगरपालिका गणेशमूर्ती संकलनाचा उपक्रम राबवते. यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. त्यानुसार महापालिकेने आज संध्याकाळपर्यंत तब्बल ३४१ गणेशमूर्ती स्वीकारल्या.

यासह महापालिकेने शाडू मातीच्या मूर्तींच्या विसर्जनास परवानगी दिली होती. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींचे अनेकांनी गोदापात्रात विसर्जन केले. मात्र पीओपीच्या मूर्तींचे गोदेपात्रात विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे ह्या मूर्ती दान स्वरूपात महापालिकेने स्वीकारल्यात आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेने रामकुंड परिसरात २६, गौरी पटांगणमध्ये १७, म्हसोबा पटांगणात १४, टाळकुटेश्‍वर येथे ११, कपिला संगम येथे ७४, नांदूर घाटात १३६ तर म्हसरूळमधल्या सीता सरोवरला ६३ गणेशमूर्ती संकलित केल्याचे मनपाचे संजय दराडे यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here