रेशन चा तांदुळ अवैध रित्या विक्री ; दोघांना अटक मोठी कारवाई

2
42

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; डॉ. बी.जी.शेखर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने आज दि.25/9/2021रोजी 16.30 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीच्या आधारे मिळालेल्या बातमी प्रमाणे मालेगाव ते नाशिक हायवेवर उमराणे उड्डाणपुलाजवळ रेशममोती वजनकाट्यासमोर 1) ललीत शेठ रा.मालेगाव हा त्यांचे हस्तक रविंद्र पंडीत पाटील वय.28 वर्षे रा.सायने बुद्रुक मालेगाव (ट्रक चालक) 3) दिनेश साहेबराव पवार वय.19 रा.मतुरपाडा,येसगाव ता.मालेगाव जि.नाशिक(ट्रक किन्नर ) हे मालेगाव ते उमराणे मार्गे वापी राज्य गुजरात येथे शासकीय सार्वजनिक वितरणाचे तांदुळ अवैध रित्या विक्री करण्याचे उद्देशाने अंदाजे 5,00,000 रुपये किमतीचे ट्रक (क्र एम.एच. 41 जी. 6815 )या मध्ये 1,50,000 /- रुपये किमतीचे सुमारे 50 किलो वजनाचे एकुण 200 कट्टे त्यात शासकीय सार्वजनिक वितरणाचे तांदुळ धान्य किमंत बाजारभाव प्रमाणे 15 रुपये प्रती किलो(शासकीय किमती 03 रुपये प्रती किलो) सह एकुण 6,50,000 किमतीचे मुद्देमालासह मिळुन आल्याने वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर बाबत पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय,देवळ ता.देवळा जि.नाशिक श्री.ज्योती ज्ञानेश्वर कपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवळा पोलीस ठाणे येथे भाग 6 प्रमाणे जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई ही मा.श्री.डॉ. बी.जी.शेखर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here