सकाळी सुरु झालेले सिटीलिंक कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; बससेवा पूर्ववत

0
34

नाशिक – गेल्या तीन महिन्यांपासून थकलेले वेतन, कंपनीची जाचक धोरणे, छोट्या-छोट्या तक्रारींवर कर्मचाऱ्यांवर होणारी कारवाई व अन्य मागणीसाठी महापालिकेच्या सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळच्या सुमारास कामबंद आंदोलन केले होते.

मात्र, सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन देत आंदोलन अवघ्या काही तासातच स्थगित झाले आणि शहर बससेवा पूर्ववत झाली. यामुळे सकाळच्या कालावधीत नागरिकांची अक्षरशः गैरसोय झाली होती. तरी काही काळ शहर बससेवा बंद राहिल्याने प्रवाशांची झालेल्या गैरसोयीबद्दल सिटीलिंक प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

सिटीलिंकच्या वतीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले की, “नाशिककरांच्या सुखकर, आरामदायी व सुरक्षित प्रवासासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली. मात्र गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी सिटीलिंक बसवरील चालक-वाहकानी कोणतीही पूर्वसूचना न देता कामबंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन पूर्णतः बेकायदेशीर आहे. तरीदेखील वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात आल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आहे व शहर बससेवा सकाळी १० वाजेपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तरी काही काळ बससेवा बंद राहिल्याने प्रवाशांची झालेल्या गैरसोयी बद्दल प्रशासन आपली दिलगीर आहे.”

का पुकारले होते आंदोलन ?

वर्षाभारापुर्वीच नाशिक महापालिकेने सिटीलिंक बससेवा सुरु केली होती, तिला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, सिटीलिंकच्या चालक-वाहकांचे ३ महिन्यांपासून थकलेले वेतन, कंपनीच्या जाचक धोरणे-अटी असल्याचा वाहकांचा आरोप ते गर्दीमुळे वाहकाला तिकीट काढण्यास विलंब झाल्यास त्याला जबाबदार ठरवत केली जाणारी दंडात्मक व निलंबनाची कारवाई यामुळे वाहक संतापले होते. त्यातच यासंदर्भात दाद मागण्यास गेल्यास त्याला होत असलेली टाळाटाळ यांमुळे आज सर्व चालक-वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here