नाशिक जिल्हा पुन्हा हादरला; गाडीत सापडला जळालेला मृतदेह

0
50

नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुंबई- आग्रा महामार्गावर पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाडीवऱ्हे परिसरातील मिलट्रीच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता पतीनेच पत्नीला जाळल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा इगतपुरीतील आंबेवाडी (Ambewadi) येथे एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. असे प्रकार वारवार घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार आंबेवाडी येथे कारमध्ये (Car) जळालेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा स्त्रीचा आहे की पुरुषाचा यासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र या अज्ञात मृतदेहाचा (dead body) खुन (Murder) करून कारला आग (Fire) लावल्याने ही कार पुर्णपणे जळुन खाक झाली आहे. तसेच कारच्या दोन्ही बाजुकडील नंबर प्लेटाही जळुन गेल्या आहेत. यामुळे ओळख पटण्यास अडचण येत आहे.

यासंदर्भात अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पत्यक्ष पाहणी करत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे, शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटने संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here