निलिमा पवारांचे संस्थान खालसा; ‘परिवर्तनचा’ सुरुंग

0
40

नाशिक ; मोठ्या चुरशीच्या झालेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चढाओढ निकालात शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळाली, प्रगती व परिवर्तन या दोन्ही पॅनलमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात परिवर्तनने विजयी आघाडी घेतली असून रात्री शेवटचे वृत्त एक वाजता हाती तेव्हाच्या निकालानुसार सत्ताधारी प्रगती पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले हे एकमेंव उमेदवार 309 मतांनी निर्णायक आघाडीवर होते बाकी ठिकाणी परिवर्तन पॅनल चा मार्ग सुखर असल्याची माहिती आहे.

नुकतेच परिवर्तन पॅनेलचे इगतपुरीतील शिक्षण सम्राट उमेदवार संदीप गुळवे हे तब्बल 1001 मतांनी विजयी झाले. तत्पूर्वी दिंडोरी, मालेगाव, चांदवड, येवला, नांदगाव, निफाड तालुक्यातील जागांवरही परिवर्तन पॅनलने विजय मिळवला आहे. इतर तालुक्याच्या जागांवरही परिवर्तन पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

20 वर्षांनंतर सत्तांतर
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत पवार घराण्याला रोखणे तसे कठीण होते मात्र यावेळी इतिहास घडला असून वीस वर्षांनंतर डॉ. वसंत पवार व त्यानंतर नीलिमा पवार यांच्या सलग 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग अ‍ॅड.नितीन ठाकरे यांनी लावला आहे.

गड आला पण सिंह गेला
सर्वच जागांवर परिवर्तनची घोडदौड सुरू मात्र परिवर्तन पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे यांचा निसटता पराभव परिवर्तनाच्या विजयी उमेदवारांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिवर्तनचे ‘हे’ उमेदवार आघाडीवर

उपाध्यक्ष – विश्वास बापूराव मोरे

सभापती – बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर

उपसभापती – देवराम बाबुराव मोगल

सरचिटणीस – ॲड. नितीन बाबुराव ठाकरे

चिटणीस – दिलीप सखाराम दळवी

नाशिक ग्रामीण – रमेश पांडुरंग पिंगळे

सिन्नर – कृष्णाजी गणपत भगत

देवळा – विजय पोपटराव पगार

बागलाण – डॉ. सोनवणे प्रसाद

नाशिक शहर – लक्ष्मण फकिरा लांडगे

कळवण – रवींद्र शंकर देवरे

महिला सदस्य

शोभा भागवत बोरस्ते

शालन अरुण सोनवणे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here