सेवक संचालक पदाच्या निवडणुकीत महाविद्यालय विभागातून प्रगती प्रणीत सेवक पॅनलचे संजय खंडेराव शिंदे विजयी तर एस. के. शिंदे आणि जगन्नाथ मधुकर निंबाळकर हे आघाडीवर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा दोन्ही पॅनल प्रमुखांनी उडवून दिला होता, एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल विक्रमी मतदान झाले.
MVP निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते, काल किरकोळ अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून मविप्रत ‘प्रगती’चा झेंडा कायम राहणार की ‘परिवर्तनाची’ नांदी यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खालील उमेदवारांचे भवितव्यचा आजच्या निकालात फैसला होणार आहे…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम