मविप्र मतमोजणीला विलंब; मतपत्रिका गहाळ असल्याने वाद निर्माण

0
32

नाशिक प्रतिनिधी: नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मविप्र साठी काल मतदान झाले असून आज सकाळ पासून मतमोजणी सुरू आहे. एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या( MVP) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू होण्याआधीच या मतमोजणीला गालबोट लागला आहे. निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता वाढली आहे.

एक मतपत्रिका गहाळ असल्याचे समोर आले असून उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण ३ चिठ्ठ्या नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याने उमेदवार आक्रमक झाले आहेत. उमेदवारांनी याबाबत तक्रार केली असून या चिठ्ठ्या सापडल्याशिवाय मतमोजणीस प्रारंभ करू नये, अशी मागणी देखील उमेदवारांनी केली आहे

KTHM च्या प्रांगणात आज तुफान गर्दी जमा झाली आहे. तसेच या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मतमोजणी स्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. दोघं बाजूचे जिल्हाभरातुन हजारो समर्थक केटीएचएम जवळ दाखल होत आहे. अशातच मतमोजणी स्थळी वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इगतपुरी तालुक्यातील 132 सभासदांचे मतदान झाले असताना मतमोजणी पूर्वी गठ्ठे तयार करत असताना त्यामध्ये एक मतपत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आले आहे त्यांची मोजणी केली असता ती 131 असल्याचे लक्षात आले असल्याने संशय निर्माण होत वाद निर्माण झाला.
या प्रकरणामुळे काहीसा तणाव निर्माण झाला असून याबाबत इगतपुरी तालुक्यातील संचालक पदाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी स्वतः उपस्थित होत पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here