नाशिक प्रतिनिधी: नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मविप्र साठी काल मतदान झाले असून आज सकाळ पासून मतमोजणी सुरू आहे. एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या( MVP) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीला गालबोट लागला आहे.
KTHM च्या प्रांगणात आज तुफान गर्दी जमा झाली आहे. तसेच या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मतमोजणी स्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. दोघं बाजूचे जिल्हाभरातुन हजारो समर्थक केटीएचएम जवळ दाखल होत आहे. अशातच मतमोजणी स्थळी वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इगतपुरी तालुक्यातील 132 सभासदांचे मतदान झाले असताना मतमोजणी पूर्वी गठ्ठे तयार करत असताना त्यामध्ये एक मतपत्रिका कमी असल्याचे निदर्शनास आले आहे त्यांची मोजणी केली असता ती 131 असल्याचे लक्षात आले असल्याने संशय निर्माण होत वाद निर्माण झाला.
या प्रकरणामुळे काहीसा तणाव निर्माण झाला असून याबाबत इगतपुरी तालुक्यातील संचालक पदाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी स्वतः उपस्थित होत पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे.
अशीच परिस्थिती दुसऱ्याही टेबलवर घडली असून त्यात अध्यक्षपदाची एक मतपत्रिका गहाळ असल्याचे समोर आले होते; मात्र ती मतपत्रिका सापडल्याने मतमोजणी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम