‘प्रगती’ की ‘परिवर्तन’ मविप्र निकालाची उत्सुकता शिगेला

0
38

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा दोन्ही पॅनल प्रमुखांनी उडवून दिला होता, एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल विक्रमी मतदान झाले.

MVP निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते, काल किरकोळ अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून मविप्रत ‘प्रगती’चा झेंडा कायम राहणार की ‘परिवर्तनाची’ नांदी यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खालील उमेदवारांचे भवितव्यचा आजच्या निकालात फैसला होणार आहे…

या उमेदवारांच्या भवितव्याचा होणार निर्णय

अध्यक्ष : डॉ. सुनील ढिकले – आमदार माणिकराव कोकाटे

उपाध्यक्ष : दिलीप मोरे – विश्वास मोरे

सभापती : माणिकराव बोरस्ते – बाळासाहेब क्षिरसागर

उपसभापती : डॉ. विलास बच्छाव – देवराम मोगल

सरचिटणीस : नीलिमा पवार – एड. नितीन ठाकरे

चिटणीस : डॉ. प्रशांत पाटील – दिलीप दळवी.

तालुका सदस्यपदासाठी यांचे भवितव्य पणाला

नाशिक शहर : नामदेव महाले – लक्ष्मण लांडगे

नाशिक ग्रामीण : सचिन पिंगळे – रमेश पिंगळे

चांदवड : उत्तमबाबा भालेराव – डॉ. सयाजी गायकवाड

मालेगाव : डॉ. जयंत पवार – एड. रमेशचंद्र बच्छाव

नांदगाव : चेतन पाटील – अमित बोरसे

इगतपुरी : भाऊसाहेब खताळे – एड. संदीप गुळवे

सटाणा : विशाल सोनवणे – डॉ. प्रसाद सोनवणे

देवळा : केदा आहेर – विजय पगार

दिंडोरी, पेठ : सुरेश कळमकर – प्रवीण जाधव

सिन्नर : हेमंत वाजे – कृष्णा भगत

निफाड : दत्तात्रय गडाख – शिवाजी गडाख

येवला : माणिकराव शिंदे – नंदकुमार बनकर

कळवण, सुरगाणा : धनंजय पवार – रवींद्र देवरे.

सेवक मतदारसंघ

संजय खंडेराव शिंदे – डॉ. संपत काळे

चंद्रजित दयाराम शिंदे – रामराव बच्छाव

जगन्नाथ मधुकर निंबाळकर – राजेश शिंदे
महिला राखीव सदस्य

सरला कापडणीस – शोभा बोरस्ते

सिंधुबाई आढाव – शालन सोनवणे

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here