MVPसाठी विक्रमी मतदान निकालाची उत्सुकता शिगेला

0
9

नाशिक प्रतिनिधी : आज जिल्ह्यातील सर्व्यात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चांगलीच तुल्यबळ लढत झाली, कार्यकारी मंडळाच्या २४ जागांसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदान झाले. अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत कोणाला किती मतदान पडणार याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक जिल्ह्यात आज राजकीय रंगत चांगलीच चढली होती यात प्रत्येक उमेदवार आपल्या परीने मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते जिल्ह्यात एकूण ५३ बूथवर मतदान झाले. या निवडणुकीसाठी संस्थेचे १० हजार १९७ सभासद होते. यापैकी ९ हजार ६८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

कार्यकारी मंडळासाठी ९४.९३ टक्के तर सेवक सभासदासाठी ८८.३४ टक्के असे एकूण ९४.६४ टक्के विक्रमी मतदान झाले असून सर्वाधिक मतदान चांदवड तालुक्यात ९८.१० टक्के झाले आहे. तर सर्वात कमी नाशिक शहर ८७.३३ टक्के मतदान झाले आहे यामुळे वाढलेल्या टक्केवारी चा कोणाला फायदा अन् कोणाला नुकसान याकडे लक्ष लागून आहे.

आज झालेल्या मतदानात कार्यकारी मंडळासाठी इगतपुरीत एकूण १३८ मतदार आहेत त्यापैकी १३२ मतदारांनी मतदान केले आहे. तर कळवण व सुरगाणा ३४८ पैकी ३२६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. चांदवड मध्ये ६८४ पैकी ६७१ मतदारांनी मतदान केले. दिंडोरी व पेठ येथे ८३८ पैकी ८१३ सभासदांनी मतदान केले आहे.

नाशिक शहर ८७६ पैकी ७६५ तर नाशिक ग्रामीणमध्ये ७०७ पैकी ६६७ इतके मतदान झाले असून निफाडमध्ये २९०३ पैकी २८०४ इतके मतदान झाले. नांदगाव व सटाणा अनुक्रमे २९२ व १४१६ पैकी २७३ व १३३५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मालेगावमध्ये ७८३ पैकी ७२६ तर येवला २०२ पैकी १९३ आणि सिन्नरमध्ये ४८३ पैकी ४२५ मतदान झाले आहे. देवळामध्ये ५६७ पैकी ५५० सभासदांनी मतदान केले. एकूण १०, १९७ सभासदांपैकी ९ हजार ६८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कार्यकारी मंडळासाठी एकूण ९४.६४ टक्के मतदान झाले आहे.

४६३ सेवक सभासदांपैकी ४०९ सभासदांनी मतदान केले असून सेवक सभासदासाठी ८८.३४ टक्के मतदान झाले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here