इंस्टा रील्सचा नाद नकोच बरा ! जास्त लाईक्स मिळाले म्हणून मित्रांनी केली मारहाण

0
34

औरंगाबाद – आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. कोरोना काळात मोबाईलमध्ये शोर्ट व्हिडीओ बनवण्याचे प्रमाण वाढले होते. त्यातच सरकारने टिकटोकवर बंदी घातल्यानंतर इंस्टा रील्स आले आणि तिथं अनेक जण रील्स बनवायला लागले. अनेकांनी तर हेच रील्स बनवणे करिअर म्हणून निवडलय. आपल्या रील्सला जास्तीत जास्त लाईक्स मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र हेच रील्सवरच्या लाईक्स एका तरुणाच्या जीवावर आले आहे, म्हणून रील्सचा नाद नसलेला बरा !

काय आहे हे सगळं प्रकरण ?

ही घटना औरंगाबादमधली असून, तिथला २० वर्षीय तरूण ऋतिक महेंद्रकर रोज रील्स बनवत असतो. असाच नेहमीप्रमाणे त्याने एक रील पोस्ट केला आणि त्या रीलला १००K लाईक्स मिळाले. रील तर चांगलाच व्हायरल झाला मात्र दोन दिवसांनंतर ओळखीच्याच काही मित्रांनी त्याला भररस्त्यात अडवत तु रिल का टाकत असतो, असा सवाल करत त्याला दमदाटी करत ऋतिकला लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरु केली.

तरुणाच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे, तसेच त्याच्या छातीवर आणि पाठीवरसुद्धा वार झाले. त्यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठत त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. माझे लाईक्स आणि फॉलोवर्स वाढत आहे म्हणून मला मारहाण केल्याचे ऋतिकने पोलिसांना सांगितले. माझ्या गाडीची मोडतोड केल्याचेही त्याने पोलीस तक्रारीमध्ये म्हटलेले आहे. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनेक युवकांना सध्या आपल्या सोशल मिडिया आयडीला लाईक्स, फॉलोवर्स वाढवण्याचे व्यसनच जणू लागलेले आहे. अनेक जण त्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. मात्र आता हे व्यसन कोणाचा जीव घेण्याइथपत जर जात असेल तर याला त्वरित आळा घालण्याची गरज सध्या बनलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here