नाशिक शहरात सराफ दुकान फोडले ; लाखोंचा ऐवज घेऊन पलायन

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक शहरात काही दिवसांपासून खून दरोडे याचे प्रमाण वाढले आहे. नाशिक मधील बंदावणे नगर परिसरात सराफाच्या दुकानातून भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास वेगाने सुरू केला आहे.

चोरट्यांनी चक्क भरदिवसा १५ तोळे सोने व सहा हजारांची रोकड घेऊन लंपास झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सपोनी किशोर कोल्हे, आदींसह पोलिसांचे पथक दाखल झाले.

अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवली असून सीसीटीव्ह फुटेज ताब्यात घेऊन तपासकार्य सुरु केले आहे. यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या लवकर आवळ्या जातील.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here