ब्रेकअप के बाद थेट कोयत्याने वार; नाशिकच्या घटनेने खळबळ

0
39

नाशिक: प्रेमा तुझा रंग कसा असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण आजकाल वासणाधिन प्रेमाच्या आहारी मनुष्य बुडल्याचे जाणवत आहे , आज नाशिकमधून एक अतिशय भयंकर धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील पाथर्डी गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावरील महिलेवर एका इसमाचे प्रेम प्रकरण जुळले होते, मात्र काही कारणांनी त्यांचे ब्रेकअप झाले, प्रेमसंबंध या महिलेने नाकारल्याचा राग मनात धरून कोयत्याने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला जखमी (Injured) झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक शहरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या चार महिन्यांपासून ही महिला पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी नामक व्यक्तीचे या महिलेसोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाल्याने दोघात तणाव वाढून आज ही घटना घडली आहे.

दीड वर्षाचा या प्रेमाच्या संसारात अडचणी आल्या व महिलेने काही कारणास्तव हे प्रेमसंबंध तोडले होते. प्रेमात हा दुरावा का असे म्हणत याचा राग मनात धरून संशयिताने आज दुपारी महिलेवर हल्ला केला. हल्यात महिला गंभीर जखमी झाली असून सध्या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची महिती आहे, संशयित हा फरार असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहे. पोलिस अधिक तपास करत असून आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here