सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील रुग्णालयांमध्ये असलेल्या असुविधांबाबत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर व त्यांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती पवार यांना निवेदन दिले होते. इगतपुरी शहरातील रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर असूनही नसल्या सारखे होते.
गरोदर मातेचे सिजर, स्त्री नसबंदी, गर्भ पिशवीचे ऑपरेशन होत नव्हते भूल तज्ज्ञांचा तपासही या रुग्णालयात नव्हता या कारणास्तव याठिकाणी कोणतीही शस्रक्रिया होत नव्हती यासोबतच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नव्हते परिणामी शवविच्छेदनासाठी देखील कर्मचारी नव्हते या कारणास्तव रुग्णांची गैरसोय होत होती.
या सर्व गैरसोयी नियमितपणे सुरळीत व्हाव्यात अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनात इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाच बेड चे आय सी यु मंजूर करावे ,सोनोग्राफी मशीन उपलब्ध करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवरे येथे श्रेणी वर्धन व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दखल केंद्रीय राज्य मंत्री डॉ भारती पवार यांनी घेतली व या सर्व मागण्यांना त्यांनी तात्काळ हिरवा कंदील दर्शविला. व तात्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाची कर्मचारी व्यवस्था सुरळीत केली. अनेक दिवसांपासून इगतपुरी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या रिक्त पदावर भुलतज्ञ डॉ प्रदीप के इंगोले हे काही दिवसांपूर्वीच उपलब्ध झाले लवकरच आय सी यु सेवा देखील उपलब्ध होणार आहे.
लवकरच इगतपुरी तालुक्यातील रुग्णालयांचा प्रश्न कायमचा मार्गी लावू असा आशावाद डॉ भारती पवार यांनी केला आहे.नवीन अधिकारी डॉ प्रदीप इंगोले यांची नेमणूक होताच योगेश चांदवडकर आणि मित्र परिवाराने बुके देऊन त्यांचे स्वागत केले.
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, सामाजिक कार्यकर्ते राजू देवळेकर, तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे,तालुका संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे,उपाध्यक्ष बाळू आम्ले, सागर नाठे आदींच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
“अनेक दिवसांपासून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त होते या कारणास्तव गर्भवती महिला, महिला नसबंदी सह शवविच्छेदन सेवेवाचून ग्रामस्थ नागरिकांची गैरसोय होत होती. या सर्व सेवा सुरळीत व्हाव्यात यासंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती अखेर या मागण्या पूर्ण झाल्या आणि नागरिकांची गैरसोय दूर झाली.”
– योगेश चांदवडकर ,भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम