श्रावणात त्र्यंबकेश्वर फेरीसाठी सिटीलिंकच्या १० जादा बसेस धावणार

0
40

नाशिक – श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे फेरीसाठी जाणाऱ्‍या भाविकांसाठी सिटीलिंक प्रशासनाने दहा जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यातच श्रावण महिन्याच्या सोमवारी यास विशेष महत्त्व असल्यामुळे दर श्रावण सोमवारी भाविकांची विशेष गर्दी होत राहते.

त्यामुळेच भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सिटीलिंककडून पहिल्या, दुसऱ्‍या व चौथ्या सोमवारी दररोजच्या २२ बसव्यतिरिक्त १० अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र तिसऱ्या सोमवारी ह्या जादा बसेस धावल्या जाणार नाही.

दर श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरसाठी असलेल्या नियमित बसबरोबरच या अतिरिक्त दहा बसेसचे नियोजन करण्यात आले असून जास्तीत-जास्त भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here