द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ;पिंपळगाव येथील स्वर्गीय राजेंद्र (आण्णा) मोरे, दगूनाना मोरे नगर ग्रामपालिकेच्या वाचनालयासाठी पिंपळगाव येथील हॉटेल व्यावसायिक गोकुळ भागवत व व्यंकटेश भागवत यांनी स्व. रमाकांत दामोदर भागवत यांच्या स्मरणार्थ ग्रंथालयासाठी ६ हजार ५०० रुपयांच्या किमतीचे ग्रंथ भेट दिली.
वाचनालयाचे विभाग प्रमुख आनंदा बनकर यांच्या कडे सुपूर्द करत ग्रंथालयात हे ग्रंथ आल्याने विद्यार्थी तसेच वाचकांना नवीन माहिती मिळणार असल्याने या सामाजिक कार्यात सर्वच स्तरातील नागरिकांनी हातभार लावण्याचे आवाहन ग्रंथालय विभागाकडून करण्यात आले.
Edit by – Rakesh Bankar
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम