सीएम शिंदे आज मालेगावी मुक्कामी; जिल्हा घोषित होण्याची शक्यता बळावली

0
44

नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून ते आज रात्री मालेगाव येथे दाखल होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी ४ वाजता मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिकमार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. साधारणत: रात्री १० वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मालेगाव शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल आणि तिथेच त्यांच्या मुक्काम असेल. उद्या ३० जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यास सुरुवात करतील.

दरम्यान या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि माजी कृषिमंत्री दादा भुसे हे मालेगावचे असून ते व आमदार सुहास कांदे हे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेतली उणीव भरून काढण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी मालेगावात येत बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी ते थेट मालेगावात येणार आहेत. त्यामुळे शिंदे हे नाशिक ऐवजी थेट मालेगाव तालुक्याचा नियोजित दौरा करणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान तालुक्यात त्यांच्याहस्ते विविध कार्यक्रमाचे भूमिपूजन, उदघाटने पार पडणार आहेत. तसेच विशेष जाहीर सभेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

मालेगावचा उल्लेख जि. मालेगाव (जिल्हा मालेगाव)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मालेगावचा उल्लेख जि. मालेगाव (जिल्हा मालेगाव) असा करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या पहिल्याच मालेगाव दौऱ्यात मालेगाव जिल्हा करण्यासंदर्भात प्रस्तवावर चर्चा होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र मालेगाव जिल्हा करण्याची मागणी गेल्या ४० वर्षांपासूनची आहे. दादा भुसे यांनी याआधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यांकडे मालेगाव जिल्हा करण्याची मागणी केली होती. तसेच एकनाथ शिंदें यांचाकडेही पहिली मागणी मालेगाव जिल्हा करण्याचीच केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ जुलै रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थान येथून गाडीने ठाणे, शहापूर, इगतपूरी, घोटी-नाशिकमार्गे मालेगावकडे मार्गस्थ होतील. मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे रात्री दहाच्या सुमारास आगमन होईल आणि तिथे ते मुक्काम करतील.
  • यानंतर शनिवार (दि. ३०) रोजी सकाळी १० वाजता ते तालुक्यातील पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणीचा आढावा आणि विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मालेगाव शहरातील क्रीडासंकुलात नाशिक ग्रामीण घटकातील नविन शासकीय निवासस्थान प्रकल्प प्रशासकीय इमारतीचे मालेगाव लोकार्पण ते करणार आहेत.
  • यानंतर बोरी-आंबेदरी आणि दहिकुटे कालव्याचे भूमिपूजन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलचे भूमिपूजन, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, जलजीवन मिशन- दाभाडी १२ गाव, माळमाथा २५ गाव, २६ गाव पाणीपुरवठा योजना, चंदनपुरी व इतर ३२ गावांच्या वैयक्तिक पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे.
  • तसेच दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद असून यानंतर मालेगावी दुपारीच्या सुमारास पोलीस मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
  • दरम्यान नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड चौफुली येथील कार्यालयास ते भेट देतील.
  • दादा भुसे हे मालेगावचे असल्यामुळे विभागीय आढावा बैठक मालेगावमध्ये होणार आहेत.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here