नासर्डी नदीपात्रात पोहणाऱ्या बालकाचा बुडून मृत्यू

0
41

नाशिक, प्रतिनिधी – शहरातील तिडके कॉलनीजवळील मिलिंदनगर परिसरातील नासर्डी नदीपात्रात पोहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १७) दुपारी घडली. सागर लल्लन चौधरी (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी) असे या मयत मुलाचे नाव आहे.

मिलिंदनगर इथली सात ते आठ मुले दुपारी मित्तल टॉवरजवळच्या नासर्डी नदीपात्राजवळ खेळत होते. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने काही मुले पाण्यात पोहण्यास उतरली, त्यांच्यासोबत सागरही पाण्यात उतरला होता. पाण्यात खेळत असताना सागर पाण्यात बुडून पाण्याच्या प्रवाहात वाहत पुढे गेला. सागरच्या मित्रांनी आरडाओरड करत मदत मागितली.

सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक आणि मुंबईनाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत आहिरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मिलिंदनगरजवळील नदीपात्रातून सागरला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सागर हा इयत्ता आठवीत शिकत होता त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण,भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील एका बिगारीचे काम करत असून आई धुणी-भांड्याचे काम करते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here