साल्हेर किल्ल्यात एकाचा पाय घसरून मृत्यू, एक जखमी

0
29

नाशिक – बागलाण तालुक्यातील शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर आज दुपारी बाराच्या सुमारास दोन हौशी पर्यटकांचा पाय घसरून दरीत कोसळल्याची घटना घडली. यापैकी एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्यामुळे निसर्गपर्यटन वाढले आहे. त्याचा आनंद लुटण्यासाठी बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील १२ तरुणांचा ग्रुप पर्यटनासाठी आलेला होता. या ग्रुपने अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर वाडीकडून उघड्या दरवाजाकडे किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. इथल्या किल्ल्याला अतिशय अवघड अशा ६५ पायऱ्या आहेत.

याच ठिकाणाहून भावेश शेखर अहिरे (वय २१) या तरुणाचा पाय घसरून दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मनिष सुनील मुठेकर (वय २१) हादेखील याच ठिकाणाहून खाली कोसळला असून तो जखमी आहे, त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. यावेळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिस घटनास्थळी पोहोचले.

साल्हेरचे सरपंच मधुकर भोये यांनी या दुर्घटनेची माहिती जायखेडा पोलिस ठाण्यात दिली. यानंतर माहिती मालेगाव येथे देण्यात आली. दरम्यान, मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचविण्यासाठी मालेगावहून साल्हेर किल्ल्याजवळ आले. पुढील तपास जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलीस नाईक रवी भामरे करत आहेत. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here