भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
35

नाशिक – औरंगाबादरोडवरील जनार्दन स्वामी मठ भागात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

मंगेश विश्वनाथ बर्वे (३९, रा.ओमकार व्हिला, म्हसरूळ लिंक रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बर्वे गेल्या सोमवारी (दि.४) रात्री पंचवटी कडून आपल्या दुचाकीवर नांदूरनाक्याच्या दिशेने प्रवास करत असताना जनार्दन स्वामी मठ परिसरातून पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने त्यांच्या दुचाकीस धडक दिली आणि हा अपघात झाला होता.

या घटनेत बर्वे गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यास तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गेले नऊ दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी (दि.१३) रात्री उपचार सुरू असताना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here